Lyrics Re Kshana.lrc Shankar Mahadevan
[id: anzonkmb]
[ar: Shankar Mahadevan]
[al: Ekda Kay Zala]
[ti: Re Kshana]
[length: 04:23]
[00:27.60]ही वादळे हृदयातली देतो तुला, घेशील ना?
[00:38.19]स्वप्ने खुळी डोळ्यातली देतो तुला, घेशील ना?
[00:48.94]ही वादळे हृदयातली देतो तुला, घेशील ना?
[00:56.09]स्वप्ने खुळी डोळ्यातली देतो तुला, घेशील ना?
[01:03.03]ही पाखरे बघ चालली क्षण घेऊनी एक-एक हा
[01:13.28]रे क्षणा, थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा
[01:25.61]रे क्षणा, थांबना…
[01:30.97]
[01:46.27]ईश्वराचे रंग हे दाही दिशांना विखुरले
[01:52.45]कण वेचले नादावुनी काही तरीही राहिले
[02:02.46]हो, ईश्वराचे रंग हे दाही दिशांना विखुरले
[02:10.03]कण वेचले नादावुनी काही तरीही राहिले
[02:17.25]जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू
[02:24.63]या तुझ्या इवल्या मुठीतून स्वप्न हे जपशील ना?
[02:34.43]रे क्षणा, थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा
[02:48.64]थांबना…
[02:52.11]
[02:59.31]बघ बोलते ना बोलताही अंतरी माया खुळी
[03:09.81]चल भरून घेऊ चार हातांनी जिण्याच्या ओंजळी
[03:19.82]ओ, बघ बोलते ना बोलताही अंतरी माया खुळी
[03:27.62]चल भरून घेऊ चार हातांनी जिण्याच्या ओंजळी
[03:34.83]देऊ किती, देऊ कसे? माझ्या खुणा, माझे ठसे
[03:42.49]सांगना, जपशील ना तू सर्व हा माझेपणा?
[03:52.19]रे क्षणा, थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा
[04:06.37]रे क्षणा, थांबना, थांबना…
[04:17.46]Year of Release: 2022